मुंबईत नवीन 1,142 कोरोना रुग्णांची भर, रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर

मिलिंद तांबे
Wednesday, 2 September 2020

मुंबईत आज 1,142 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,46,947 झाली आहे.मुंबईत आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,690 वर पोचला आहे.

मुंबई : मुंबईत आज 1,142 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,46,947 झाली आहे.मुंबईत आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,690 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,596 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे. 

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

मुंबईत आज नोंद झालेल्या 35 मृत्यूंपैकी 28 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 28 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 35 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 22 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. 

आज 1,596 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,18,864 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 80 दिवसांवर गेला आहे. तर 31 ऑगस्ट पर्यंत एकूण 7,75,974  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 25 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.87 इतका आहे. 

 

'राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मुर्ती काळाच्या पडद्याआड';मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

मुंबईत 577 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,293 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,080 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,555 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With a total of 1,142 new corona patients in Mumbai, the cure rate is 81 per cent