MBA CET 2020! एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर! शशांक प्रभू राज्यात प्रथम

MBA CET 2020! एमबीए सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर! शशांक प्रभू राज्यात प्रथम


मुंबई : एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेलने शनिवारी (ता.23) सकाळी जाहीर केला. डोंबिवली येथील शशांक प्रभू या शिक्षकाने 159 गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळावला आहे. त्यांना 99.99 पर्सेन्टाईल मिळाले आहेत. या परीक्षेत केवळ 4 विद्यार्थ्यांना 200 पैकी 150 हून अधिक गुण मिळाले आहेत. तर 126 ते 150 पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 392 आहे.

सीईटी सेलच्या वतीने 14 आणि 15 मार्च रोजी राज्यातील 148 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेच्या निकालात 51 ते 100 पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. राज्यात दुसरा क्रमांक अंकित ठक्कर याने मिळवला आहे. त्याला 155 गुण मिळाले आहेत. तर तिसऱ्या स्थानावर आकांक्षा श्रीवास्तव आहे. हिला 153 गुण मिळाले आहेत.
सीईटी सेलच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली पहिलीच सीईटी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर निकालही जाहीर करण्यात आला आहे.  मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीs राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या महाविद्यालयांमध्ये सुमारे 36 हजार 765 जागा उपलब्ध आहेत. या जागावर सीईटीत मिळालेल्या मेरिट नुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

सीईटीचे उतीर्ण विद्यार्थी

प्रात्प गुण        विद्यार्थी संख्या
151-175           4
126-150      392
101-125         3924
51-100        55001
00-50          51310

   यापूर्वीच माझे एमबीए पूर्ण झाले आहे. सध्या मी ठाणे येथील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिक्षक आहे. विद्यार्थांना चांगले मार्गदर्शन करता यावे आणि माहितीच्या जगात अपडेट राहण्यासाठी ही परीक्षा देत आहे. गेल्या पाच परीक्षांमध्ये सलग मी 99.99 पर्सेन्टाईल  प्राप्त केले आहेत. मी प्रवेश प्रकियेत सहभागी होणार नाही.
- शशांक प्रभू - एमबीए परीक्षेत राज्यात प्रथम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com