फुटबॉल खेळता खेळता पाणी पिऊन आला, चक्कर आली आणि निर्भय तिथेच कोसळला..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई - मृत्यू कधी कुणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही, यावरूनच आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची प्रचिती येते. असाच एका धक्कादायक प्रकार सोमवारी मुंबईत घडलाय. मुंबईत सोमय्या महाविद्यालयात तो मित्रांसोबत फुटबॉल खेळात होता आणि मुत्यूने त्याला तिथेच गाठलं.  

मुंबई - मृत्यू कधी कुणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही, यावरूनच आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची प्रचिती येते. असाच एका धक्कादायक प्रकार सोमवारी मुंबईत घडलाय. मुंबईत सोमय्या महाविद्यालयात तो मित्रांसोबत फुटबॉल खेळात होता आणि मुत्यूने त्याला तिथेच गाठलं.  

ही दुर्दैवी घटना घडलीये मुंबईतील सोमय्या कॉलेजमध्ये. निर्भय मिश्रा असं या २६ वर्षीय विद्यार्थ्यांचं नाव आहे. हा विद्यार्थी मूळचा पुण्याचा होता. निर्भय हा सोमयय कॉलेजमध्ये MBA च्या प्रथम वर्षांचं शिक्षण घेतोय. कॉलेजच्या मैदानात फूटबॉल खेळत असताना त्याला तहान लागल्यामुळे तो कॅंटीनमध्ये गेला आणि परत आल्यानंतर त्याला चक्कर आली. चक्कर आल्याने निर्भय पडला आणि लगेच त्याचा मृत्यू झाला.

मोठी बातमी : मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..

वैद्यकीय चाचणीत त्याचा मृत्यू हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे झालाय असं  नमूद करण्यात  आलंय. यापूर्वीही सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धेदरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. 

तरुणांमध्ये का वाढतंय हृदयविकाराचं प्रमाण ?

एका अहवालानुसार जगभरात हृदयविकारचा झटका येणार्‍या लोकांपैकी २० टक्के लोक हे ४० आणि त्या खालील वयाचे असतात. सध्याचं धावपळीचं आयुष्य आणि त्यामुळे जोडून येणारी बदललेली जीवनशैली ही या हृदयविकाराची प्रमुख करणं आहेत. तरुणांमध्ये व्यसनांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. याचसोबत तरुणांमध्ये व्यायामाची कमतरता देखील पाहायला मिळतेय. मानसिक ताण तणाव, बाहेरील खाण्याने वाढलेलं ब्लड आणि शुगरचे प्रमाण यामुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतंय. 

मोठी बातमी :  जाऊदे यावर्षी भाड्याच्या घरात राहू, पुढच्या वर्षी पाहू..

कशी घ्याल काळजी ? 

हृदयविकारपासून दूर राहण्यासाठी स्वछ आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. दररोज हलका व्यायाम किंवा थोडं चालणं किंवा जॉगिंग करावं.  ताण तणावापासून जमेल तितकं दूर रहा. नियमित ब्लडप्रेशरआणि शुगर तपासात रहा, व्यसनांपासून दूर रहा.

MBA student of Somaya college passes away due to heart attack while playing football in campus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MBA student of Somaya college passes away due to heart attack while playing football in campus