जाऊदे यावर्षी भाड्याच्या घरात राहू, पुढच्या वर्षी पाहू..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

मुंबई - मुंबईत राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे स्वत:च एक हक्काचं घर असावं. मात्र, मुंबईकरांनी स्वत:च घर खरेदी करण्याचा विचार सोडून दिलाय की काय असाच प्रश्न आता निर्माण होताना पाहायला मिळतोय. मागील वर्षी म्हणजे २०१९ मध्ये जितक्या घरांची निर्मिती झाली, त्या तुलनेत घरांची विक्री झालेलीच नाही अशीही एक  धक्कादायक बाब समोर आलीये. मुंबई आणि परिसरातील गृहनिर्माण क्षेत्र थंडावल्याच चित्र दिसून येतय. अशात आता मुंबईकर स्वत:च घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्याच घराणं जास्त पसंती देत आहेत.

Photo - उदयन राजेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं थेट उत्तर, मुंबईत लागले पोस्टर्स..

२०१९ मध्ये मुंबईत घरांच्या दरामध्ये घट झालेली पाहायला मिळाली. मात्र कमी झालेल्या दारानंतरदेखील मुंबईत घर घेणं परवडेनासं आहे. वाजवी दरातली घरं सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरची आहेत. २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ७९ हजार ८१० घर बांधण्यात आली होती. मात्र त्यानंतरच्या सहा महिन्यात घर बांधणीचा आकडा ३५ हजार ९८८ वर आला आहे. २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांत, त्या आधीच्या तुलनेत सहा महिन्यांच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाली तर दुसर्‍या सहा महिन्यांमध्ये घर खरेदी तब्बल १४ टक्क्यांनी घटली.

मोठी बातमी - मनसेच्या इंजिनात कुणाचं इंधन? बाळा नांदगावकर यांचं आणखी एक 'मोठं' विधान
 
दरम्यान मुंबईत नवीन घरांचं बांधकाम जोरात सुरू आहे. मुंबई आणि परिसरात २०१९ या वर्षात ६१ टक्के नवीन प्रकल्पांची सुरुवात झाली. मात्र नवीन वर्षात सुद्धा घर खरेदी करणार्‍यांची संख्या कमीच होताना दिसतेय. नवीन घरं बांधली जात आहेत, मात्र या घरांच्या किंमती ७५ लाख रुपयांच्या वर आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकराच्या खिशाला ही घरं परवडणारी नाहीत. याउलट मुंबईकर भाड्याच्या घरांना पसंती देतायेत. भाड्यावर  कार्यालय घेण्याचंही प्रमाण  वाढल्याचं असल्याच दिसून येतय.

मोठी बातमी - भारतातील 'मेगा-स्ट्रक्चर' दोन वर्षात पूर्णत्त्वास येणार, मुंबईच्या कक्षा रुंदावणार

दिवसेंदिवस महागाई वाढतेय, अशात महागाईच्या  जमान्यात सामान्य मुंबईकरांनी घर खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. 

buying rate of houses decreased in mumbai in last year 2019

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buying rate of houses decreased in mumbai in last year 2019