

Political developments intensify in Ambernath as Shiv Sena explores possibility of inducting Congress corporators.
esakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होणार असं वाटत असतानाच काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना पक्षानं निलंबित केलं. त्यामुळं तांत्रिक दृष्ट्या हे नगरसेवक सध्या अपक्ष असून त्यांचा गटही स्थापन झालेला नाही. त्यामुळं त्यांच्यातले 2 - 4 नगरसेवक फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला, किंवा ते एखाद्या पक्षात गेले, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. याचाच फायदा घेत शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी आवश्यक 2 नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्याचा जोरदार प्रयत्न सध्या सुरू असून पुढे काय होतं? याकडे संपूर्ण अंबरनाथ शहराचं लक्ष लागलंय.