esakal | पोलिसांच्या हाती लागलं ८० कोटींचं 'म्याऊ म्याऊ'चं घबाड...
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या हाती लागलं ८० कोटींचं 'म्याऊ म्याऊ'चं घबाड...

पोलिसांच्या हाती लागलं ८० कोटींचं 'म्याऊ म्याऊ'चं घबाड...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत अय्याशी आणि मोठायकी दाखवण्यासाठी अनेकजण ड्रग्जचं सेवन करतात. ड्रग्स आयोग्यासाठी किती घातक आहेत याची कल्पना असूनही अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्जच्या आहारी जातात आणि आयुष्य उध्वस्त करून घेतात. मोठ्या प्रमाणात मुंबईत ड्रग्जचा व्यवहार सुरु असतो. हा ड्रग्जचा व्यवहार थांबवण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई केलीये आणि यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा देखील हस्तगत करण्यात आलाय.     

मोठी बातमी - मटणावरून मैत्रीत मिठाचा खडा; सुनील मटण संपलंच कसं म्हणत छातीत टाकला..

अशीच एक धडक कारवाई मुंबई पोलिसांच्या ATS विभागाने केलीये. इन्स्पेक्टर दया नायक यांच्या नेतृत्वात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत म्याऊ म्याऊ नामक म्हणजेच MD ड्रग्जचं घबाड पोलिसांच्या हाती लागलंय. या कारवाईत एमडी ड्रग्जचा सर्वात मोठा अड्डा देखील उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत ४.२ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज आणि ८० कोटींचं केमिकल जप्त करण्यात आले आहे.

मोठी बातमी - आणि अजमल कसाब म्हणाला "भारत माता की जय..." 

या कारवाईदरम्यान म्याऊ म्याऊचं पुणे कनेक्शन देखील समोर आलंय. महाराष्ट्र एटीएसच्या जूहू युनिटच्या अधिकाऱ्यांनी महेंद्र पाटील आणि संतोष अडाके या दोघांना डिसेंबर महिन्यात अटक केली होती. मुंबईत सहा डिसेंबरला मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत यांना ताब्यात घेतलं होतं. यामध्ये महेंद्र पाटील आणि संतोष अडाके या दोघांकडून तब्ब्ल चौदा किलो म्याऊ म्याऊ ड्रग्ज  म्हणजे MD ड्रग्ज सापडले पकडलं गेलं होतं. त्याच माहितीच्या आधारे ATS पथकाने पुढील कारवाई करत तपासाची सूत्र फिरवली. यावरून पुण्यातील MIDC भागात अल्फा कंपनीवर रेड मारत MD ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत केला.

मोठी बातमी  - मुंबई-अलिबाग बोट प्रवास तासाभरात! 'हे' आहेत दर...

या छाप्यात ४.२ कोटी रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज आणि हे ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे ८० कोटी रुपये किमतीचं केमिकल रॉ मटेरियल पोलिसांनी पकडलंय.  याबाबतीत तपास करत असताना पोलिसांनी आणखी दोघांना अटक केलेली आहे. या घटनेत आणखी काहींची अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  

ATS busts MD manufacturing unit drugs and raw material worth Rs 80 crore seized