कोट्यवधी बिलासाठी औषध विक्रेते आक्रमक, हाफकिनला औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा

कोट्यवधी बिलासाठी औषध विक्रेते आक्रमक, हाफकिनला औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा

मुंबई: सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या औषधं विक्रेत्याची देयके थकीत असल्याने संताप अनावर झालेल्या औषध पुरवठादारांनी आता औषधं हाफकीनला औषधं पुरवणार नाही असा इशारा दिला आहे. वारंवार थकित बिलाप्रकरणी उत्तर मागून ही सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने औषध विक्रेत्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हाफकिन देयके अदा करत नसल्याने नाईलाजाने उपोषण करणार असल्याचे औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. शिवाय, जर सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला तर त्यासाठी औषध विक्रेते जबाबदार नाही असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

डीएमईआर आणि डीएचएस अशा दोन्ही अंतर्गत येणाऱ्या सरकारी रुग्णालयांना पुरविण्यात आलेल्या औषधांची रक्कम 220 कोटीच्या घरात असल्याचे ऑल फूड अँड ड्रग्स लायसनास होल्डर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर हाफकिनला प्रलंबित देयकांच्या बाबत विचारले असता देयके टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, औषध विक्रेते देयकांचे पैसे वर्ष उलटून गेले तरी मिळत नसल्याची तक्रार मांडतात.

सरकारी रुग्णालयांना हाफकिनद्वारे औषध पुरवठा करण्यात येतो. पुरवठादार हाफकिनला औषध पुरवठा करतात. मात्र औषधांचे पैसे देताना सरकारकडून देयके मान्य न झाल्याचे कारण हाफकिन पुरवठादारांना देत असल्याचे पुरवठा दर सांगतात. 2018 ते 2020 या काळात 260 कोटी रुपये किंमतीची औषध हाफकिनकडून मागविण्यात आली. मात्र त्यातील 220 कोटींची बिले अद्याप प्रलंबित आहेत. यामुळे औषध पुरवठादार संतापले आहेत. आता देयके मिळावीत म्हणून हाफकिनच्या आवारात उपोषणाची परवानगी मागत आहेत. मात्र, देयके मिळाली नसली तरी उपोषण करण्यावर ठाम असल्याचे पांडे म्हणाले. 

थकीत बिलांसदर्भात चौकशी करण्यासाठी जाणार्‍या वितरकाला हाफकिनमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालकही या प्रकरणी वेळ देत नसल्याने औषध वितरकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकित बिले तातडीने बिले मंजूर करण्यात यावी, यासाठी औषध वितरकांकडून हाफकिन बायो फार्मासिट्युकल समोर आंदोलन करण्यात येणार आहे.

हाफकिनला पुरवठा थांबवण्याचे परिणाम 

सर्जिकल ड्रग्स (215 आयटम) 

सर्जिकल नॉन ड्रग (27 आयटम) 

सर्जिकल स्टेपलर्स आणि जाळी (81 आयटम)

सर्जिकल सूट (194 आयटम) आणि 100 हून अधिक उपकरणे निविदांवर परिणाम होईल. या आंदोलनात 100 हून अधिक पुरवठादार आणि 1000 हून अधिक औषध कंपन्यांचा समावेश आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Medicine dealers aggressive billions of bills warning Halfkin stop supplying Medicine

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com