कोरोना संदर्भातील मोठी बातमी - अमेरिकेत वापरलं जाणारं 'हे' महत्त्वाचं औषध आता मुंबईतील रुग्णांवरदेखील वापरलं जाणार ...

कोरोना संदर्भातील मोठी बातमी - अमेरिकेत वापरलं जाणारं 'हे' महत्त्वाचं औषध आता मुंबईतील रुग्णांवरदेखील वापरलं जाणार ...
Updated on

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव देशात वाढत असून पावसाळ्यात संसर्ग अधिक वाढण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. रुग्णांसह गंभीर आजारी असलेले रुग्ण दगावण्याचे प्रमाण ही वाढत आहे. त्यातच कोरोनावर प्रभावी औषध किंवा लस नसल्याने कोरोना मृत्यू रोखणं मोठं आव्हान आपल्यासमोर उभं टाकलंय. 

कोरोनावर ठोस औषध येईपर्यंत इतर संसर्गजन्य आजारावरील जी औषधं उपलब्ध आहेत, त्या औषधांचा वापार कोरोना आजाराविरोधात करण्यात येतोय. अमेरिकेत 'इबोला' आजारावर वापरण्यात येणारे औषध मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांवर वापरण्यात येणार आहे.

अमेरिकेतही कोरोनाने थैमान घातले असून कोरोनामुळे लाखो नागरिकांचे प्राण गेलेत. अमेरिकेसह इतर देशांत संसर्गजन्य आजारावरील 'रेमडेसिवीर' या औषधामुळे कोरोना रुग्णांमध्ये सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात लवकरच कोरोना रुग्णांवर आपात्कालीन उपचारासाठी या औषधाचा वापर करण्यात येणार आहे. या औषधांच्या वापरास ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने मंजुरी सुद्धा दिली आहे.

अमेरिकेतील गिलियड सायन्स या कंपनीचे हे औषध आहे. इबोला या आजारासाठी हे औषध तयार करण्यात आलं, ते आता कोरोना आजारासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अमेरिकेनंतर भारतातही हे औषध वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रॉयटर'ने दिलेल्या वृत्तानुसार गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर आपात्कालीन परिस्थितीत हे औषध वापरण्याची परवानगी 1 जून पासून देण्यात आली आहे. असे ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने इमेल मध्ये सांगितले आहे.

कोरोना रुग्णांना सध्या इतर आजारांवरील वापरातील जी औषधं दिली जातायत तीसरसकट सर्व रुग्णांना देता येत नाहीत. मात्र हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या संशयित आणि कोरोना पॉझिटिव्ह  आहे अशी माहिती आहे. महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ किंवा लहान मुलांना देखील हे औषध देता येणार आहे. अमेरिकेत एका रुग्णाला 10 दिवस हे औषध दिले जात होते भारतात मात्र 5 दिवस हे औषध दिले जाणार आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडलेला भारत हा जगातील 7वा देश ठरला आहे.

अमेरिकी, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन आणि इटली या देशाने 2 लाखांचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे देशात दररोज सरासरी 8 हजार रुग्णांची नोंद होत आहे तर 300 रुग्णांचा मृत्यू होत आहेत. महत्वाची बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट हा इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे WHO ने देखील भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

भारतात ऍलिओपॅथीसह होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांचा प्रयोग करून रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्याचाच एक भाग म्हणून आता या आणखी एका औषधाचा प्रयोग करण्यात येत आहे.

medicine used for ebola cure will be used for covid in mumbai read full news 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com