अलिबागमध्‍ये लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचा एल्‍गार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

नागोठणे येथील रिलायन्स कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्तांसह कंत्राटी, कायम कामगार आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने बुधवारी लाक्षणिक ठिय्या आंदोलन केले.

 

मुंबई : नागोठणे येथील रिलायन्स कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्तांसह कंत्राटी, कायम कामगार आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने बुधवारी लाक्षणिक ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनात हजारोच्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ, महिला व तरुण सहभागी झाले. यावेळी रिलायन्स कंपनीविरोधात घोषणांनी येथील परिसर दणाणून गेला होता. अलिबाग एसटी स्थानकातून लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हिराकोट तलावासमोर सभेत रूपांतर झाले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नागू पाटील यांच्या पुढाकाराने चरीचा संप झाला. या संपामुळे शेतकरी जमिनीचे मालक झाले. मात्र सध्याची परिस्थिती खूपच विदारक असून अंबानी, अदानीच्या घशात जमिनी घालण्याचा डाव मोदी सरकारने आखला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हक्कासाठी मोर्चे, आंदोलन करणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्याला हक्क मिळेपर्यंत लढायचे असल्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्‍त केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Democracy Movement Conflict Committee in Alibaug