स्थायी समितीची बैठक अखेर रद्द 

स्थायी समितीची बैठक अखेर रद्द 

नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असतानाही सोमवारी सकाळी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक घेण्याचा सदस्यांनी प्रयत्न केला. मात्र, सचिव चित्रा बाविस्कर यांनी ही बैठक झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन होईल, असे स्पष्ट केल्यानंतर कामकाज रद्द करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीची आचारसहिता कोणत्याही वेळी लागू होईल ही शक्‍यता लक्षात घेऊन गेल्या आठवडाभरात तीन वेळा स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. या "लगीनघाईत' सुमारे पाचशे कोटींपेक्षा अधिक खर्चाची कामे मंजूर करून घेतली आहेत. यात अनेक महत्वाची विकास कामे अगदी काही मिनीटांत मंजूर करण्यात आली आहेत. याच वेगात आणखी काही विकास कामे होतील, या अपेक्षेने गेल्या आठवड्यातच 11 मार्चसाठी कार्यक्रम पत्रिका जाहीर केली होती. मात्र रविवारी संध्याकाळी आचारसंहिता लागू झाली. त्यानंतरही यादरम्यान नियोजित वेळेप्रमाणे स्थायी समिती बैठकीसाठी सोमवारी सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आले होते. तसेच सभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी प्रशासनाचे विभाग प्रमुखही होते. मात्र या बैठकीला आचारसंहीतेचे बंधने असल्यानचे बाविस्कर यांनी सांगितले. त्यानंतर सभापती सुरेश कुलकर्णी यांनी बैठक रद्द केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com