esakal | या रविवारी रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईकरांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रविवारचा मेगाब्लॉक रद्द 

या रविवारी रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईकरांना दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) रविवारी येत असल्यामुळे मध्य आणि पश्‍चिम रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मोठी बातमी पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम..

मात्र त्याअगोदर पश्‍चिम रेल्वेवर शुक्रवारी (ता. 24) रात्री बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लाॅक रात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत पाचव्या मार्गिकेवर आणि मध्यरात्री 12.15 ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत "अप' जलद मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येतील.

हे वाचलेय का... महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का

परिणामी या काळात "अप' जलद मार्गावरील लोकल बोरिवली ते अंधेरीदरम्यान धीम्या मार्गावरून धावणार आहेत. मात्र या ब्लाॅकमुळे फारसा त्रास प्रवाशांना होणार नाही. रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिवसभर आपल्या कुटुंबासह फिरणाऱ्यांना रेल्वेच्या निर्णयाचा लाभ होणार आहे.

Mega block canceled on Sunday

loading image
go to top