Local Mega Block: कुठे सेवा रद्द, तर कुठे विलंबाने? रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार मेगाहाल!

Mumbai local Mega Block News: 19 जानेवारीला मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आहे. यामुळे प्रवाशांना फटका बसणार आहे. तसेच काही रेल्वे सेवा विलंबाने धावणार आहे.
Mega Block
Mega BlockEsakal
Updated on

मुंबई: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिकांसाठी रविवारी (ता.१९) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग, तर ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या बोरीवरी ते भाईदर अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी तिन्ही मार्गावरील प्रवाशांचे मेगाहाल होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com