Megablock: लोकल वाहतुकीला उद्या ब्रेक! मध्य, ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन कामे, पाहा वेळापत्रक

Mumbai Local Train Megablock: उपनगरी रेल्वे मार्गावर तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २९) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on: 

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २९) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर ठाणे ते वाशी/नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्री रात्रकालीन कामे केली जाणार असून, दिवसा काेणताही ब्लाॅक नाही.

Loading content, please wait...