ऊर्जा विभागात होणार महाभरती; महापारेषणमध्ये तांत्रिक आणि अभियांत्रिकी संवर्गातील पदे भरली जाणार

तेजस वाघमारे
Friday, 23 October 2020

मंत्री डॉ. राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला

मुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रूपात एक आगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत  जवळपास  8500  तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी शुक्रवारी (ता.23) दिले. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याने हजारों तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबई पोलिस दलाची व पोलिस आयुक्ताची बदनामी केल्याप्रकरणी रिपब्लिकच्या वार्ताहर व अँकरवर गुन्हा

राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6 हजार 750 पदे व अभियंता संवर्गातील 1 हजार 762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत असल्याने बेकारीचे संकट झेलणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.

खडसेंच्या प्रवेशाआधी राजकीय घडामोडी, जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण

मंत्री डॉ. राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहेत.

नागपुरी संत्री एपीएमसीमध्ये दाखल! किरकोळ बाजारात चढ्या दरात विक्री 

हजारो तरूणांना संधी
पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन 2005 साली महावितरण, महापारेषण,  महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने कोरोना काळात राज्यात सरकारी नोकरीची संधी हजारो तरुणास उपलब्ध होणार आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mega recruitment in mahapareshan of Power department in Mharashtra