मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई  - रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी मध्य; तसेच हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार नागरिकांना प्रवासाचे नियोजन करावे लागेल. 
मध्य रेल्वे - 
- विद्याविहार- मशीद स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत ब्लॉक. 
- ब्लॉकच्या कालावधीत घाटकोपर येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या धीम्या लोकल सकाळी 10.58 ते दुपारी 4.24 पर्यंत विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावरून धावतील. 

- या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ (डबल हॉल्ट), भायखळा येथे थांबतील. 
- या लोकल विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सॅंडहर्स्ट रोड आणि मशीद स्थानकात थांबणार नाहीत. 
- या मार्गावरील प्रवाशांना व्हाया घाटकोपर, कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांतून प्रवास करण्याची मुभा असेल. 
- ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या जलद व अर्धजलद गाड्या नियोजित स्थानकांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांत थांबतील. 
- कल्याण येथून सुटणाऱ्या जलद व अर्धजलद गाड्या सकाळी 11.04 ते दुपारी 3.06 पर्यंत नियोजित स्थानकांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांत थांबतील. 

हार्बर मार्ग - 
- पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक. 
- पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल सकाळी 11.06 ते सायं. 4.34 पर्यंत; तर सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूर, वाशीला जाणाऱ्या गाड्या सकाळी 10.03 ते दुपारी 3.39 पर्यंत रद्द राहतील. 

ट्रान्स हार्बर मार्ग - 
- पनवेल येथून ठाण्याला जाणाऱ्या गाड्या सकाळी 10.12 ते दुपारी 4.26 पर्यंत आणि ठाणे येथून पनवेलला सुटणाऱ्या गाड्या सकाळी 11.14 ते सायं. 4 वाजेपर्यंत रद्द राहतील. 
- ब्लॉकच्या कालावधीत ठाणे, वाशी, नेरूळदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल. 
- ब्लॉकच्या कालावधीत पनवेल ते अंधेरीदरम्यानची सेवा बंद असेल. 

पश्‍चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक 
पश्‍चिम रेल्वेवर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भाईंदर ते वसई स्थानकांदरम्यान विरारच्या दिशेला जलद मार्गावर जम्बो ब्लॉक असेल. या काळात जलद लोकल वसई-विरार ते भाईंदर-बोरिवलीपर्यंत अप धीम्या मार्गावर; तर डाऊन जलद लोकल बोरिवली ते वसई, विरारदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावतील. 

Web Title: Megablock on Central and Harbour line