मुंबईकरांना दिलासा! मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मुसळधार पावसाने ठाणे परिसरात पावसाने कहर केल्यानंतर​ मध्य रेल्वेचा कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

मुंबई : हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य​ आणि पश्चिम रेल्वेचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर हार्बर मेगाब्लॉक मात्र रद्द करण्यात आलेला नाही. ​ 

मुसळधार पावसाने ठाणे परिसरात पावसाने कहर केल्यानंतर​ मध्य रेल्वेचा कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

तसेच हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर​ आणि दरम्यान रविवारी (ता. 4) ब्लॉक घेऊन कामे करण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megablock of Central and Western Railway canceled