
Megablock : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक!
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचवी सहावी मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्व -
कुठे- विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाउन पाचवी सहावी मार्गिकेवर
कधी- सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम-
या ब्लॉकदरम्यान एलटीटी येथे येणार्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. बनारस- एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, पाटलीपुत्र- एलटीटी एक्सप्रेस, कोईम्बतूर- एलटीटी एक्सप्रेस, प्रयागराज- एलटीटी दुरंतो एक्सप्रेस, गोरखपूर- एलटीटी एक्सप्रेस, छाप्रा - एलटीटी एक्सप्रेस, चेन्नई - एलटीटी एक्सप्रेस, आग्रा कॅंटॉंमेंट - एलटीटी लष्कर एक्सप्रेस.
एलटीटी येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. एलटीटी - गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, एलटीटी -जयनगर एक्स्प्रेस, एलटीटी - तिरुवानंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, एलटीटी - काकीनाडा एक्स्प्रेस, एलटीटी - वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, एलटीटी- पटना एक्स्प्रेस,एलटीटी -मंगळुरू एक्स्प्रेस.
हार्बर रेल्वे
कुठे - पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबई येथून पनवेल/बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप- डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.