
मुंबई: उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.