Mumbai Local MegablockESakal
मुंबई
Local Megablock: मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, जाणून घ्या रविवारी कशी असणार लोकलची स्थिती?
Mumbai Local Megablock: ९ मार्चला मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक आहे. यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. ९) मध्य रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आला नाही.

