रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

मध्य रेल्वे 
कुठे :
    कल्याण ते दिवा अप (सीएसएमटी दिशेने) जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.२५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. परिणामी उपनगरीय लोकल १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत.

हार्बर रेल्वे
कुठे : 
पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आणि नेरुळ/बेलापूर-खारकोपर या अप-डाऊन मार्गावर.
कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत ब्लॉक.
परिणाम : बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-बेलापूर/पनवेल या दोन्ही अप-डाऊन मार्गावरील लोकलसेवा बंद असणार. तसेच पनवेल-अंधेरी आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे-पनवेल-ठाणे या मार्गावरील लोकल बंद ठेवण्यात येणार आहेत. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-वाशी आणि ट्रान्स हार्बरवरून ठाणे-वाशी/नेरुळ या मार्गावरून विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे. बेलापूर-सीवूड्‌स-उरण मार्गावरील लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ४.१६ पर्यंत बंद राहणार आहे.

पश्‍चिम रेल्वे
कुठे : 
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या अप-डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून होणार. ब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द असणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megablock on three lines of railway