उद्या मुंबईत लोकलने प्रवास करण्याचा विचार करताय. तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी...

file photo
file photo

मुंबई : उपनगरी रेल्वेमार्गावर रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. 22) तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंडदरम्यान "डाऊन' जलद मार्ग, सीएसएमटी-चुन्नाभट्टी-वांद्रे मार्ग आणि बोरिवली ते भाईंदर या मार्गांवर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतील. या मेगाब्कॉकमुळे रविवारी प्रवाशांची गैरसोय होणार आहे. 

मध्य रेल्वे 
कुठे : माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान "डाऊन' जलद मार्गावर. 
कधी : रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. 
परिणाम : या स्थानकांदरम्यान "डाऊन' जलद लोकल धीम्या मार्गावर. मेल/एक्‍स्प्रेस आणि लोकल सुमारे 20 मिनिटे विलंबाने. 

हार्बर मार्ग 
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान "अप' आणि "डाऊन' मार्गांवर. 
कधी : रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत. 
परिणाम : सीएसएमटी-वाशी/बेलापूर/पनवेल/गोरेगाव या स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद. कुर्ला ते पनवेल विशेष लोकल. 

पश्‍चिम रेल्वे 
कुठे : बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान "अप' आणि "डाऊन' धीम्या मार्गावर. 
कधी : रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. 
परिणाम : धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक जलद मार्गावर. काही लोकल रद्द. 

Megablock tomorrow on all three railroads

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com