पश्‍चिम रेल्वेवर उद्या जम्बोब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

मुंबई - रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी (ता. १०) जम्बोब्लॉक; तर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई - रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी (ता. १०) जम्बोब्लॉक; तर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटीदरम्यान रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथून रविवारी सकाळी ११.३४ ते दुपारी ०४.४७ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलला रवाना होणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल, तसेच वांद्रे, अंधेरी, गोरेगाव येथून सीएसएमटीला सुटणाऱ्या लोकल सकाळी ९.५६ ते दुपारी ०४.४३ पर्यंत रद्द राहतील. 

 

Web Title: megablock on Western Railway tomorrow