मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेच्या देखभाल कामांसाठी रविवारी (ता. 13) रेल्वेच्या पश्‍चिम मार्गावर जम्बोब्लॉक, तर हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर सकाळी 10.35 ते 3.35 दरम्यान माहीम ते अंधेरी स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अंधेरी येथून दोन्ही दिशेकडील हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्‍चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे मार्गावर रविवारी सकाळी 11.20 ते 4.20 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे या मार्गावर रविवारी सकाळी 11.40 ते 4.40 दरम्यान, तर चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी या मार्गावर सकाळी 11.10 ते 4.10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत कल्याण येथून सुटणाऱ्या सर्व धीम्या आणि अर्धजलद गाड्या कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. तसेच मुलुंड स्थानकापुढे आपल्या नियोजित अप धीम्या मार्गावरून धावतील व सर्व स्थानकांत थांबे घेतील. ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कलवा स्थानकात लोकल थांबणार नसल्याने व्हाया ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकातून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या कालावधीत लोकल 15 मिनिटे उशिराने धावतील. हार्बर मार्गावर सकाळी 11.34 ते 4.47 दरम्यान सीएसएमटी, वडाळा रोड येथून वाशी, बेलापूर, पनवेलकडे येणाऱ्या गाड्या, तसेच सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 दरम्यान सीएसएमटी येथून वांद्रे, अंधेरी, गोरेगावकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

पनवेलसाठी विशेष गाडी 
पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रविवारी सकाळी 9.53 ते 3.20 दरम्यान तसेच सकाळी 10.45 ते 4.58 दरम्यान अंधेरी, वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकच्या कालावधीत कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक 8 वरून पनवेलसाठी विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 6 दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्‍चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

Web Title: Megablocks on Central Harbor line