कोरोनामुळे आईचं पार्थिव 20 दिवस चीनमध्येच; मुंबईतील मेहरा कुटुंब म्हणतंय...

कोरोनामुळे आईचं पार्थिव 20 दिवस चीनमध्येच; मुंबईतील मेहरा कुटुंब म्हणतंय...

मुंबई : चीनमध्ये कोरोना वायरसने थैमान घातलं आहे. चीनच्या सर्वच शहरात कोरोना वायरसमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. मात्र मुंबईच्या एका कुटुंबाची व्यथा वेगळीच आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या रिटा मेहरा या आपल्या कुटुंबासोबत बीजिंगवरुन मुंबईला येत होत्या मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र आता तब्बल २० दिवस उलटूनही रिटा यांचे पार्थिव शरीर चीनमध्येच आहे. चीन आणि भारत यांच्यातील विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचं पार्थिव शरीर घरी परंतु शकलेलं नाही. 

मोठी बातमी - जेलमध्ये अजमल कसाबने ऐकली 'अजान' आणि....

नक्की काय घडलं :

मुंबईतील वांद्र्यामध्ये राहणारे डॉ. पुनीत मेहरा यांच्यावर कुटुंबावर ही स्थिति ओढावली आहे. पुनीत मेहरा हे उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुनीत यांना मुंबईला आणण्यासाठी त्यांच्या ६३ वर्षांच्या आई रिटा राजेंद्र मेहरा मेलबर्नला गेल्या होत्या. २४ जानेवारी २०२० रोजी मेहरा मायलेक एअर चायनाच्या विमानाने बीजिंगमार्गे मुंबईला निघाले होते. या प्रवासात रिटा विमानात बाथरुममध्ये गेल्या, मात्र बराच वेळ उलटूनही आई परत न आल्यामुळे पुनित यांना शंका आली. त्यांनी जाऊन बघितले आणि क्रूला याबद्दल माहिती दिली. याबद्दल पाहणी केल्यानंतर रिटा विमानातल्या बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आल्या होत्या. रिटा यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी विमानाचं चीनच्या झेंगझोऊ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. मात्र रिटा मेहरा यांचा मृत्यू झाला होता.

७ फेब्रुवारी रोजी डॉ. पुनित भारतात परत आले. मात्र त्यांच्या आईचं पार्थिव शरीर अजूनही झेंगझोऊमधल्या शवगृहात आहे. कोरोना वायरसच्या संसर्गाच्या भीतीने पुनीत मेहरा यांना भारतात परतावं लागलं. मात्र त्यांच्या आईच पार्थिव शरीर मिळत नसल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

त्यांच्या आईचे पार्थिव लवकरात लवकर भारतात यावे यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे साकडं घातलं आहे. त्यांचा शोकात बुडालेला परिवार त्यांच्या आईच्या पार्थिवाची वाट बघतोय.  

mehara family seeks help from foreign ministry to bring rita mehras body back to india  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com