जेलमध्ये अजमल कसाबने ऐकली 'अजान' आणि....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचत्रित्रात एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे केले आहेत. या पुस्तकात त्यांनी मुंबईमधील २६/११ हल्ला आणि अजमल कसाबबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत.

"भारतात मुस्लिमांना नमाज अदा करू दिली जात नाही" असं लष्कर-ए-तोयबाकडून अजमल कसाबला सांगण्यात आलं होतं. मात्र, जेलमध्ये कसाबने अजान ऐकली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला, असं राकेश मारिया यांनी पुस्तकात लिहिल आहे.

मोठी बातमी - बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..

कसाबला मुंबईवरील हल्ल्याच्या आधी हे पटवून देण्यात आलं होतं की भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतात. भारतात मुस्लिमांना नमाजही अदा करू दिला जात नाही. अशाप्रकारे लष्कर-ए-तोयबने कसाबचं ब्रेनवॉशिंग केला होतं. मात्र जेंव्हा कसाब पकडला गेला, त्यानंतर तो तुरुंगात असताना त्याने मशिदीतून 'अजान' ऐकली आणि तो चकित झाला. कसाबला मेट्रो सिनेमाजवळच्या मशिदीत घेऊन जाण्यात आलं. तेंव्हा लोकांना नमाज अदा करताना पाहून त्याला आश्चर्य वाटले, असंही राकेश मारिया यांनी पुस्तकात लिहिल आहे.

मोठी बातमी - "कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

कसाबला दिले होते १.२५ लाख :

मुंबईवर हल्ला करण्याच्या आधी लष्कर-ए-तोयबाने त्याला एक आठवड्याची सुट्टी दिली होती. त्याचबरोबर कसाबला १.२५ लाख देण्यात आले होते. हे १.२५ लाख त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी दिले गेले होते. अजमल कसाब हा सुरुवातीला फक्त लुटपाट करण्यासाठी लष्कर-ए-तोयबामध्ये गेला होता. मात्र त्यानंतर अजमल कसाब याचं ब्रेनवॉशिंग केल्यामुळे तो दहशतवादी कारवायांकडे वळला, असंही या पुस्तकात राकेश मारिया यांनी म्हंटल आहे. 

rakesh maria relieved truth about ajmal kasab and indecent of listening to ajan in jail

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rakesh maria relieved truth about ajmal kasab and indecent of listening to ajan in jail