...राज्यपालांच्या भेटीवेळी कुठे होते आदित्य ठाकरे ?

मिलिंद तांबे 
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

वासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पूर व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी केली.

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पूर व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी विनंती यावेळी युवासेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.

महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून युवासेनेच्या मागणीवर कार्यवाही करण्याची विनंती युवासेनेचे सरचिटणीस वरून सरदेसाई, सुरज पाटील यांनी राज्यपालांना केली.

आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती

आदित्य ठाकरे हे युवासेनेचे प्रमुख आहेत.मात्र राज्यपालांच्या भेटीला आलेल्या शिष्टमंडळात आदित्य ठाकरेंचा समावेश नव्हता.राज्यात ओला दुष्काळ आहे.शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत.

आदित्य ठाकरेंनी आपल्या कोकण दौऱ्यात अनेक गावांना भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली.तिथल्या शेतकाऱ्यांशी,विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यामुळे राज्यपालांना भेटून त्यांना राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यपालांसमोर मांडण आवश्यक होतं.मात्र आदित्य ठाकरे मुंबईत असून ही राज्यपालांना भेटण्यासाठी का गेले नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय.

Webtitle : members of yuvasena met governor of maharashtra aaditya thackeray was absent 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: members of yuvasena met governor of maharashtra aaditya thackeray was absent