आठवणी 26 जुलैच्या महापुराच्या...

दिनेश गोगी
गुरुवार, 26 जुलै 2018

रामनाथ सोनवणे हे 22 फेब्रुवारी 2003 ते 30 नोव्हेंबर 2005 या कालावधीत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदी होते. सडपातळ बांधा असला तरी दांडगी इच्छाशक्ती लाभलेल्या सोनवणे यांनी त्यांच्या सुमारे अडीच वर्षाच्या कारकिर्दीत पालिकेचा पूर्णतः कायापालट केला होता.

उल्हासनगर - तो 26 जुलै 2005 चा महापूर आठवला की, आजही उल्हासनगरकरांच्या अंग-मनाचा थरकाप उडतो. ते वाहून जाणारे माणसे घरे त्यांच्या नजरेसमोर येतात. याचसोबत पालिका अधिकारी-लोकप्रतिनिधी दरवर्षी त्या तत्कालीन आयुक्तांच्या आठवणींना उजाळा देतात ज्यांनी लेप्टोस्पायरसच्या विळख्यात सापडल्यावरही पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरुन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या शहराला कधीही विसर पडणार नाही असे नाव म्हणजे रामनाथ सोनवणे.

रामनाथ सोनवणे हे 22 फेब्रुवारी 2003 ते 30 नोव्हेंबर 2005 या कालावधीत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदी होते. सडपातळ बांधा असला तरी दांडगी इच्छाशक्ती लाभलेल्या सोनवणे यांनी त्यांच्या सुमारे अडीच वर्षाच्या कारकिर्दीत पालिकेचा पूर्णतः कायापालट केला होता. आज ज्या पालिकेतील नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसोबत विविध दाखले मिळतात ती देण सोनवणे यांचीच. याशिवाय नागरिकांनी वारंवार पालिकेच्या पायऱ्या झिजवण्याचा प्रकार थांबावा, त्यांना जवळच्याच कार्यालयात सोयीस्कर व्हावे यासाठी शहरातील गोल मैदान, यात्री निवास,व्हिटीसी आणि नेताजी येथे चार प्रभाग समिती कार्यालयाची निर्मिती केली ही देण देखील सोनवणे यांच्याच दूरदृष्टीचीच. त्यामुळे नागरिकांच्या पालिकेतील फेऱ्या टळल्याचे चित्र दिसत असून प्रभाग समितीतच त्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत.

उल्हासनगर विकासाच्या दिशेने आगेकूच करत असतानाच आणि त्यासाठी रामनाथ सोनवणे यांची टीम सक्रीयतेने रिझल्ट देत असतेवेळीच 26 जुलै रोजी आलेला महापूर अनेक भागांना उध्वस्त करून गेला. अशावेळी कल्याणला राहणारे सोनवणे यांनी उल्हासनगरातच मुक्काम ठोकला.आपात्कालीन अधिकारी-कर्मचारी-अग्निशमन दलाच्या सोबत पुराच्या पाण्यात उतरून पूरपरिस्थिती आटोक्यात किंबहूना नियंत्रणात आणण्यासाठी आठवडाभर डे-नाईट काम केले. शहराचा आढावा घेत गेले.हे करतेवेळी सोनवणे हे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पालिकेत त्यांच्या दालनात असतानाच, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अधिकाऱ्यांनी त्यांना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना लेप्टोस्पायरस झाल्याचे निदान दिल्यावर सोनवणे यांना रात्रीच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. व्हीलपॉवर असल्याने सोनवणे लेप्टोस्पायरस मधून लवकर सावरले आणि पुन्हा सक्रिय झाले होते.या घटनेला 13 वर्ष झाले असले तरी आठवणींना अद्यापही उल्हासनगरकर उजाळा देत आहेत. याघडीला नागपूर महानगरपालिका मध्ये कार्यरत असलेले रामनाथ सोनवणे यांना 2005 च्या महापुराच्या आठवणीं विषयी विचारणा केली असता, तो केवळ कर्तव्याचा भाग होता. अशी मोजकी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Memories of 26 th july mumbai flood