रयत शिक्षण संस्थेत कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थींच्या भेटीने आठवणींना उजाळा

The memories of meeting with activists and former students in the Rayat Shikshan Sanstha
The memories of meeting with activists and former students in the Rayat Shikshan Sanstha

मोखाडा- रयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, मोखाड्यातील महाविध्यालयात कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात येथील शाळा, महाविध्यालयात शिक्षण घेतलेल्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी आणि शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या भेटीने, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी सर्व ऊपस्थितांनी आपल्या शाळेबद्दल आदर व्यक्त करित, कर्मवीरांच्या विचारामुळे च आपण घडल्याची कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय जून 1984 पासून पदवी  तर 1992 पासून उच्च उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम ह्या आदिवासी बहुलपट्ट्यात ज्ञानदानाचे काम करते आहे. ह्या महाविद्यालयाची मातृसंस्था रयत शिक्षण संस्था ही आपले शताद्बी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने संस्थेचे व महाविद्यालयाचे कार्यकर्ते, हितचिंतक व माजी विद्यार्थ्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने शनिवार दि. 13/10/2018 रोजी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते, हितचिंतक व माजी विद्यार्थी मेळावचे आयोजन केले होते.

या मेळाव्यास महाविद्यालात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच कार्यकर्ते व हितचिंतकांची उपस्थिती होती. याप्रसंगी महाविद्यालाचे जेष्ठ मार्गदर्शक रामचंद्र धारणेकाका, अॅ्ड. देविदास पाटील, श्यामकांत चुंभळे, राजाराम काळे, बाबुराव दिघा, विद्यमान जि. प. सदस्य प्रकाश निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे समन्वय समितीचे सदस्य सुनील भुसारा, भाजप मोखाडा तालुका अध्यक्ष रघुवीर डिंगोरे, शहर अध्यक्ष विलास पाटील, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख रवींद्र कटीलकर व मनसेचे माजी पालघर जिल्हा ऊपाध्यक्ष  देवेद्र वैद्य, आदी मान्यवर या मेळाव्यासाठी उपस्थित होते.

तसेच, प्राथमिक शिक्षक नीतिन आहेर, भूविकास बँकेचे माजी शाखाध्यक्ष उल्हास धारणे, अशोक घोलवड, मोहन पाटेकर ,डी. सी. पाटील, वियन काशिकर, नाझीम मनियार, प्रकाश निकम, सुनील भुसारा यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी कार्यकर्ते, हितचिंतक व माजी विद्यार्थी यांना संबोधित करताना महाविद्यालाचे प्राचार्य, डॉ. जे. जी. जाधव उपस्थित सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. व महाविद्यालयासाठी म्हणून जी जी मदत करणे आपणास शक्य आहे. ती करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितींना केले. या कार्यक्रमाच्या अध्क्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅाड. देविदास पाटील होते. त्यांनी  रयत शिक्षण संस्थेने या आदिवासी पट्ट्यात ज्या हेतूने शिक्षण आणले. तो हेतू या शताद्बी वर्षानिमित्त सर्वत्र पोहचवूया असे आवाहन उपस्थिताना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. मगदूम बी. एम. यांनी केले तर आभार या मेळाव्याचे समन्वक प्रा. जे. बी. वारघडे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com