

Mercedes Car Accident
ESakal
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पावसामुळे एका शाळेच्या बसवर भलेमोठे झाडं कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. चेंबूरमधील या घटनेत एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईतील ही घटना ताजी असताना पुन्हा मुंबईत शाळेच्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. फोर्ट परिसरात एका मर्सिडीज कारने स्कुल व्हॅनला धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत कसलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.