रांगोळीतुन दिला 'डिजिटल बनो‘चा संदेश

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

डोंबिवली : भारताला जगात महासत्ता म्हणून नेतृत्व करायचं असेल तर डिजिटल इंडिया शिवाय पर्याय नाही, असा संदेश संस्कारभारतीच्या डोंबिवली समितीच्या रांगोळी कलाकारांनी नववर्षाच्या स्वागतासाठी श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली येथे काढण्यात आलेल्या महारांगोळीतून दिला आहे.

गेली 35 वर्षांपासून साहित्य व ललितकला संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या संस्कार भारतीने 'डिजिटल बनो‘मार्फत जगाशी जोडणाऱ्या सर्वच सोशल साईटवरील चिन्हांसोबतच पारंपरिक चिन्हांचा देखील समावेश या रांगोळीत केलेला आहे.

सुमारे 200 किलो रांगोळी, 150 किलो रंग, 30 रांगोळी कलाकार आणि अखंड 8 तासांच्या परिश्रमातून साकारण्यात आलेली ही महारांगोळी 15 × 55 फूटांची आहे. समाजात नसूनही Socially Connect असणाऱ्या सर्वांना 'डिजिटल बनो, भारत को महासत्ता बनाओ' चे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Message digital india from Rangoli