esakal | परिक्षा रद्द झाल्यावर खास मेसेज Whatsappवर व्हायरल

बोलून बातमी शोधा

परिक्षा रद्द झाल्यावर खास मेसेज Whatsappवर व्हायरल
परिक्षा रद्द झाल्यावर खास मेसेज Whatsappवर व्हायरल
sakal_logo
By
संदीप पंडित

मुंबई: कोरोनाची पार्श्वभूमीवर लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आधी शिक्षण बोर्डाने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात पाठवलं होतं. पण दहावी आणि बारावीची परिक्षा होणारच असं बोर्डाकडून ठणकावून सांगितलं गेलं. पण अखेर दहावीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. परिक्षा रद्द झाल्यानंतर सध्या एक भन्नाट मेसेज सोशल मीडियावर फिरताना दिसतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था बंद आहेत. शाळांनाही सुट्टी असून काही वर्गातील मुलांना पुढच्या वर्गात परीक्षा न घेताच पाठवण्यात आले आहे. यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यातीलच एक प्रतिक्रिया साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून त्यास मेसेजला मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळाताना दिसतेय.

हेही वाचा: 'आमदारांचा विकासनिधी कोरोना लढ्याकडे वळवा'; अमर काळेंची मागणी

शाळेत आणि महाविद्यालयात अनेक विषय शिकवण्यात येतात. या सर्व विषयांची सांगड घालणारा एक मेसेज सध्या जोरदार चर्चेत आहे. तो मेसेज असा... 'इतिहासात प्रथमच भूगोलाची परिक्षा रद्द झाली. आणि तीही जीवशास्त्रामुळे. याचा परिणाम समाजशास्त्रावर होत आहे. नागरिकशास्त्राची कस लागून सर्वांचे अर्थशास्त्र बिघडले आहे. बर्‍याच जणांचे मानसशास्त्र बिघडत चालले आहे, यावर रसायनशास्राचे उपाय चालू आहेत परंतू या सूक्ष्म जीवाने सर्व पृथ्वी व्यापल्यामूळे सर्व भूगोलच बिघडला आहे. शिल्लक काय आहे तर उपचारांचे गणित आणि माणूसकीची भाषा'!! सध्या हा मेसेज जवळपास प्रत्येकाच्या WhatsApp वर आला असेल.

img

हेही वाचा: "काँग्रेसला हे अजिबात आवडलेलं नाही"; राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी

या मेसेजमध्ये शिक्षणासंबंधीचे विविध विषयांचा उल्लेख असला तरी अखेर माणुसकीची भाषा एकमेकांना कशापद्धतीने धरून आहे आणि आधार देत आहे, हे दाखवण्यात आले आहे. आताची तरुणाई फक्त मज्जा करते असं मानणाऱ्यांना हा मेसेज म्हणजे एक चांगलेच उत्तर आहे.