कोरोना संसर्गाबाबत तुम्हाला ही आलाय असा मेसेज, जाणून घ्या काय आहे सत्य?

rumors
rumors

मुंबई : अफवांवर विश्वास ठेवू नका पण का काळजी घ्या असा सल्ला वैद्यकिय तज्ञांनी दिला आहे.3 मे पासून इनक्यूबिनेशनची तारीख संपुष्टात येईल. बरीच कोरोना प्रकरणे पुढे येतील. बऱ्याच लोकांना संसर्ग होण्याचा धोका असेल म्हणून घरी राहणे खूप महत्वाचे आणि आवश्यक आहे, असे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. 

3 ते 18 मे या काळात आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण त्या वेळी आपण व्हायरसच्या सर्वात टॉपच्या बाजू वर राहू, सहसा सर्व संक्रमण या दोन आठवड्यांत दिसून येतील, त्यानंतर पुढील दोन आठवडे शांत राहतील आणि पुढील दोन आठवड्यांमध्ये ते कमी होते. त्यामुळे या काळात वस्तू खरेदीसाठी बाहेर पडू नका, अशा आशयाचे संदेश समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. 

हा मेसेज म्हणजे निव्वळ अफवा असल्याचा दावा वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ करत आहेत. विषाणूचा इनक्यूबिनेशन काळ हा त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो. तो 5-6 दिवसांपासून 14 दिवसांपर्यंत कितीही कालावधीचा असतो. या मेसेज नुसार विषाणूचा स्फोट हवेत होऊन तो सर्वत्र फिरेल असं वाटते. पण विषाणूची संख्या हवेत वाढत नाही, ती मानवी शरीरातच वाढते, त्यामुळे संपुर्ण जगासाठी इनक्यूबीनेशनची तारीख एकाच दिवशी संपणे शक्य नाही.

या संदेशामध्ये तथ्य नाही. मात्र, नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सामजिक अंतर पाळणे अत्यंत महत्वाचे आहे.   - डॉ. सुभाष साळूंखे, सल्लागार, महाराष्ट्र राज्य साथ रोग तज्ञ  समिती 
 

 This is the message you got about corona infection, so be careful ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com