
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. रविवार पासून अनेक भागात पावसाच्या मुसळधार सारी कोसळत आहेत. यामुळे काही भागात झाडे, वीज कोसळण्याच्या घटना घडत असून नदी नाल्यांना देखील पूर आले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोरे आले आहे. अशातच आता पुढील काही दिवस पावसाची हीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.