Mumbai Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा रेड अलर्ट

Mumbai Weather Update: मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. आयएमडीने रेड अलर्टसह हायटाईडमुळे सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
Mumbai Rain

Mumbai Rain

ESakal

Updated on

मुंबई : ​गेल्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. ४ जुलै रोजी सकाळी ८:३० ते आज, ५ जुलै सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांत २५० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने (आयएमडी) मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com