

Mumbai heavy rain forecast
Sakal
मुंबई : मुंबईत रविवारी दिवसभर रिमझिम सरी सुरू होत्या. सकाळपासूनच आकाश ढगाळ राहिले आणि अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. दक्षिण मुंबईत मात्र पावसाचा जोर काहीसा जास्त होता. सायंकाळी ६च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह पावसाने जोर धरला आणि तो रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला.