
Mumbai Weather Update
ESakal
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज म्हणजेच शुक्रवार (ता. २६) रोजी देखील पावसाची ये-जा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अशातच पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.