
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असून शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पावसाने मुंबईला झोडपून काढले असून सांताक्रूझमध्ये २४४.७ मिमी, तर कुलाब्यात ८३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत सांताक्रूझमध्ये १६८०.३ मिमी, तर कुलाब्यात १२०२.४ मिमी पावसाचा आकडा गाठला आहे.