
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचा वेग मंदावला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरे तसेच मध्य मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.