
वसई : पावसाळी पर्यटनासाठी अनेकांचा कल पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांकडे असतो, मात्र जुलैमध्ये १२ दिवस साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याने किनाऱ्यालगतची वस्ती तसेच पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारी बंद आहे. अशातच आता समुद्रालगतच्या पारंपरिक मासेमारीवर देखील बंदी टाकण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमारांसमोर विविध आव्हाने उभी ठाकली आहेत.