

Kalyan To Ulhasnagar Metro-5
ESakal
कल्याण : मेट्रो-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) प्रकल्पाच्या विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून, कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली व उल्हासनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.