मेट्रोच्या खांबाचा सांगाडा 'बेस्ट'वर कोसळला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मालाड - कांदिवली येथे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील मेट्रोच्या खांबाचा लोखंडी सांगाडा गुरुवारी दुपारी बेस्ट बसवर कोसळला. यात कोणतीही मोठी हानी झाली नाही.

मालाड - कांदिवली येथे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील मेट्रोच्या खांबाचा लोखंडी सांगाडा गुरुवारी दुपारी बेस्ट बसवर कोसळला. यात कोणतीही मोठी हानी झाली नाही.

"बेस्ट'च्या 718 क्रमांकाच्या बसवर आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हा सांगाडा पडला. हा सांगाडा केवळ लोखंडी सळ्यांचा होता, त्यात कॉंक्रीट भरले नव्हते. त्याचा पुढचा भाग बसवर पडल्याने त्याचे फारसे वजनही नव्हते. त्यामुळे मोठी हानी न होता बसच्या छताचे किरकोळ नुकसान झाले. क्रेन आणून हा सांगाडा हटविण्यात आला. काही महिन्यांपूर्वी मालाड लिंक रोडवर असाच लोखंडी सांगाडा पडला होता. त्याही वेळी कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नव्हते. गोरेगाव पूर्व येथे सिमेंट बीमचा काही भाग पडल्याने काही मजूर गंभीर जखमी झाले होते.

Web Title: Metro Pole Colapse on Best Bus