अर्णब गोस्वामी यांची आजची रात्रही कोठडीतच, जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत स्थगित

अर्णब गोस्वामी यांची आजची रात्रही कोठडीतच, जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत स्थगित

मुंबई, ता. 6 : मागील दोन दिवसापासून कारागृहात असलेल्या रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली गेलीये. त्यामुळे आजची रात्रही रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना कारागृहात काढावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून आजही गोस्वामी यांना दिलासा मिळालेला नाही. उद्या शनिवार आहे. शनिवारी न्यायालय बंद असतं,  मात्र स्पेशल केसमध्ये उद्या याप्रकरणी न्यायालय प्रतिवाद्यांना ऐकणार आहे. सर्व बाबी ऐकल्यानंतर उद्या मुंबई उच्च न्यायालय अर्णब यांच्या जामीन प्रकरणी निर्णय देऊ शकतं. 

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. याविरोधात त्यांनी हेबियस कोर्प्स याचिका उच्च न्यायालयात केली असून पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केल्याचा आरोप केला आहे.

आज न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर सुनावणी झाली. दंडाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय दोन वर्षांपूर्वीचे प्रकरण पोलिसांनी उघड केले आहे. सत्तेचा गैरवापर करुन आणि विधीमंडळात गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग कारवाई करुन या प्रकरणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे न्यायालयाने स्वतःच्या विशेषाधिकारात जामीन मंजूर करावा आणि तपासाला अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे आणि एड आबाद पोंडा यांनी न्यायालयाकडे केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालाचा दाखला त्यांनी दिला. अपवादात्मक परिस्थितीमध्ये सत्र न्यायालयाऐवजी थेट उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, उद्या यावर पुढील सुनावणी होणार असून राज्य सरकार आणि तक्रारदार नाईक यांच्यावतीने बाजू मांडण्यात येणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

no interim relief to arnab goswami bombay high court will continue hearing tomorrow

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com