मेट्रो सेवा सुरु करण्याबाबत चर्चा; मात्र नियमावली पाळावी लागणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने देशभरातील लॉकडाऊनमध्ये तिसऱ्यांदा वाढ केली आहे. त्यामुळे बंद असलेल्या मेट्रो सेवा लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा कशा सुरू कराव्यात, याबाबत विचार सुरू आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने देशभरातील लॉकडाऊनमध्ये तिसऱ्यांदा वाढ केली आहे. त्यामुळे बंद असलेल्या मेट्रो सेवा लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा कशा सुरू कराव्यात, याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात मेट्रोच्या सेवेत महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात.   

मोठी बातमी ः कर्मचारी हवालदिल, पालिका प्रशासन अडचणीत; कोरोना संकटांत कसा सोडवणार हा तिढा

देशभरात मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करण्यात येत आहे. त्यानुसार टोकन पद्धत बंद करून केवळ कॉंटॅक्टलेस स्मार्ट कार्डचा वापर सुरू होऊ शकतो. मेट्रोतून प्रवासासाठी प्रत्येक वेळी टोकन खरेदी करावे लागते. परिणामी मेट्रो स्थानकांतील खिडक्यांसमोर रांगा लागतात. यापुढे स्मार्ट कार्ड रिचार्ज पद्धत सुरू केली जाईल; त्यामुळे प्रवाशांची गर्दी होणार नाही, असे एका एमएमआरडीए अधिकाऱ्याने संगितले.  

मोठी बातमी ः चिंताजनक ! ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंंख्या 100 पार

या उपाययोजना 

  • कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी मेट्रो स्थानकांवर दोन प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, प्रवाशांची तपासणी करणे आदी उपाययोजना. 
  • प्रवासादरम्यान मास्क बांधणे बंधनकारक. मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे आवश्यक. फ्लूची लक्षणे असलेल्या प्रवाशांना मनाई.
  • आरोग्य सेतू अॅपवरून प्रसिद्ध झालेल्या ई-पासच्या मदतीने संभाव्य कोरोनाग्रस्तांची ओळख पटवणे शक्य. 
  • मेट्रो स्थानकांत येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या दारांजवळ हॅंड सॅनिटायझर व हॅंड वॉशची व्यवस्था. 
  • मेट्रोच्या प्रत्येक स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशाचे थर्मल स्कॅनिंग.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: metro service will starts with strict rules and regulations