कर्मचारी हवालदिल, पालिका प्रशासन अडचणीत; कोरोना संकटांत कसा सोडवणार हा तिढा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

मुंबईबाहेर राहणारे आरोग्य खात्यातील डॉक्टर, परिचारिका यांची वेगवेगळ्या हॉटेलांत राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. शेजारील महापालिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हद्दबंदी केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना येथेच राहावे लागणार आहे.

मुंबई : मुंबईबाहेर महापालिकेचे सुमारे 16 हजार कर्मचारी राहतात. शेजारील महापालिकांनी हद्दबंदीचा निर्णय घेतल्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. मुंबईत निवासाची व्यवस्था न झाल्यास त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

महत्वाची बातमी : यंदा पावसाळ्यात मुंबईकरांना कोरोनासोबत 'या' परिस्थितीचा देखील करावा लागणार सामना?

नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांनी हद्दबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका, इतर आस्थापना आणि खासगी कार्यालयांत काम करणारे पण मुंबईबाहेर राहणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांमधील सुमारे 16 हजार कर्मचारी अन्य महापालिकांच्या हद्दीत राहतात. 

हे ही वाचा : प्रशासनाला सुनावलं, क्वारंटाईन करण्याबद्दल मुंबई हायकोर्ट म्हणतंय...  

मुंबईबाहेर राहणारे आरोग्य खात्यातील डॉक्टर, परिचारिका यांची वेगवेगळ्या हॉटेलांत राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. शेजारील महापालिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हद्दबंदी केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना येथेच राहावे लागणार आहे. त्यांच्या निवासासासाठी जागा उपलब्ध करणे, ही प्रशासनापुढे मोठी अडचण ठरली आहे.

मोठी बातमी : ...नाहीतर येत्या काळात त्या खासगी डॉक्टर्सचे परवाने होणार रद्द !

उपस्थिती बंधनकारक
महापालिका कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थितीचे परिपत्रक आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी जारी केले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहणे बंधनकारक आहे.

Staff in tension, bmc administration in difficulties; How to solve Corona crisis


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Staff in tension, bmc administration in difficulties; How to solve Corona crisis