"मेट्रो 3'च्या भुयाराचे काम ऑक्‍टोबरपासून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या "मेट्रो 3' प्रकल्पाच्या भुयाराच्या मजबुतीकरता आवश्‍यक असलेले "टनेल रिंग' तयार करण्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वडाळा येथील कास्टिंग यार्डमध्ये मंगळवारपासून सुरुवात केली. भुयार तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रे जुलैपर्यंत मुंबईत येणार आहेत. हे काम ऑक्‍टोबरपासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

या प्रकल्पासाठी 40 हजार टनेल रिंगची आवश्‍यकता असून, त्यासाठी 65 साच्यांची गरज आहे. हे साचे फ्रान्स, कोरिया येथून आणले जाणार असून काही साचे दिल्ली मेट्रोकडून मागवण्यात येतील. प्रत्येक साच्यात सहा रिंग तयार होतील. कॉर्पोरेशनने उभारलेल्या सहा कास्टिंग यार्डमध्ये हे काम करण्यात येईल. 

कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी भिडे यांनी मंगळवारी कास्टिंग यार्डमध्ये पूजन करून या कामाला प्रारंभ केला. या वर्षाच्या अखेरपर्यंत भुयार तयार करण्याचे काम सुरू होणार असून, नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता म्हणाले की, प्रकल्पाच्या दृष्टीने हा क्षण महत्त्वाचा असून आम्ही टनेल सेगमेंट रिंग नियोजित वेळेच्या आधीच तयार करण्यास सुरुवात केली आहे. 

Web Title: Metro's subway work from 3 October