
मुंबई : सध्या खाजगी रुग्णालयांतील उपचारांची किंमत इतकी जास्त आहे की सामान्य लोकांसाठी ते परवडणं कठीण होत आहे. अशा महागाई मध्ये आरोग्य सेवा एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित होऊ लागले आहेत. गरीब व मध्यमवर्गीय लोकांना मूलभूत आरोग्य सेवा घेणं सोप्पं व्हावं, म्हणून मुंबईतील MHADA (महाराष्ट्र हाऊसिंग आणि एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) ने "आपला दवाखाना" योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत, नागरिकांना फक्त ₹1 मध्ये डॉक्टरांचा सल्ला आणि ₹10 मध्ये तपासणी सेवांचा लाभ मिळेल असे सांगितले आहे. MHADA च्या वसाहतींमध्ये स्थापित करण्यात येणारे हे क्लिनिक मुंबईकरांना अत्यल्प खर्चात उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरवतील.