समुद्रकिनाऱ्याजवळील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा 

समुद्रकिनाऱ्याजवळील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा 
Updated on

मुंबई : शहर आणि उपनगराच्या समुद्रकिनाऱ्यालगत अनेक दशकापासून वसलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास म्हाडा आणि एसआरएमार्फत करण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत सरकार निर्णय घेणार असून यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडणार असून म्हाडाची लँड बँकही वाढेल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

राज्यातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरे विकता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर सध्या इमारत बांधल्यानंतर 5 वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. बहुतांश प्रकल्प पूर्ण व्हायला 5 ते 10 वर्षांचा अवधी लागतो. म्हणून झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणतीही एसआरएची योजना ही 10 ते 15 वर्षांच्या अगोदर तयार होत नाही. त्यामुळे त्याला घर मिळायला 15 वर्षे लागतात. यामध्ये दोन पिढ्यांचे नुकसान होते. यामुळे या नियमांत बदल करण्यात येणार आहे. दरम्यान, एसआरएमधील खरेदी विक्री केलेल्या रहिवाशांना नोटीस पाठवली असून याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. याबाबतचा नियम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याबाबत समितीचा लवकरच निर्णय होऊ शकतो. असे आव्हाड यांनी सांगितले.

बीडीडी चाळींच्या बांधकामाला होणार सुरुवात

सगळ्या बीडीडी चाळींच्या बांधकामाचे या महिन्यात उदघाटन कार्यक्रम होणार आहे. वरळी येथील चाळीत उदघाट्नचा कार्यक्रम असेल. तीन ते चार वर्षात बीडीडी उभी राहील असा आमचा प्रयत्न आहे. 

अन्यथा विकसकांवर होणार पोलिस कारवाई

अनेक बिल्डर्सनी २० टक्क्यांमधील घरं घरे अद्याप दिलेली नाहीत. दरम्यान ज्या विकासकांनी अद्याप घरं दिलेली  त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, त्यांना  पोलिस कारवाईला सामोरे जावे, असा इशारा आव्हाड यांनी दिला.

mhada and SRA will redeveloped slums attached to seashore of mumbai jitendra awhad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com