
Mhada
मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे म्हणून २५ वर्षापूर्वी ठाणे चितळसर येथील घरांसाठी काढलेल्या लाॅटरीमध्ये विजेते ठरलेल्यांसाठी आता पुन्हा लाॅटरी काढली जाणार आहे. मात्र सदरची लाॅटरी घरांकरिता विजेते ठरण्यासाठी नाही तर उपलब्ध असलेल्या सदनिकांपैकी कोणती सदनिता कोणाला याची निश्चिती करण्यासाठी काढली जाणार आहे. त्यासाठी म्हाडा संबंधितांकडून लवकरच ऑनलाईन स्वरूपात फाॅर्म भरून घेतले जाणार आहेत.