esakal | म्हाडा कोकण मंडळाच्या८९८४ घरांसाठी उद्या सोडत; घरबसल्या दिसणार थेट प्रक्षेपण | Mhada
sakal

बोलून बातमी शोधा

MHADA

म्हाडा कोकण मंडळाच्या८९८४ घरांसाठी उद्या सोडत; घरबसल्या दिसणार थेट प्रक्षेपण

sakal_logo
By
- तेजस वाघमारे

मुंबई : म्हाडाच्या (MHADA) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या आठ हजार ९८४ सदनिकांची (Apartment) संगणकीय सोडत ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये (dr Kashinath ghanekar theatre) गुरुवारी (ता. १४) काढण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्या हस्ते सोडत निघेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (corona) नाट्यगृहात मर्यादित अर्जदारांनाच प्रवेश दिला जाणार आहे. https://mhada.ucast.in संकेतस्थळावर (website) अर्जदारांना सोडतीचे घरबसल्या वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा म्हाडाने उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा: मुंबई- पुणे दरम्यान विशेष गाड्या; मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय  

सोडतीसाठी दोन लाख ४६ हजार ६५० नागरिकांनी अर्ज भरले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची गोड बातमी मिळावी म्हणून ढोल-तुतारीच्या निनादात सोडतीचे नियोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील कार्यक्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी स्वतःचे ओळखपत्र व अर्जाची मूळ पावती सोबत आणावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. सोडतीचा निकाल उद्या सायंकाळी ६ वाजता https://lottery.mhada.gov.in आणि https://mhada.gov.in संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

सोडत कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी उपस्थित राहणार आहेत.

loading image
go to top