
Mhada House
ESakal
मुंबई : म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील विजेत्यांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने डिसेंबर २०२३ मध्ये २६५ घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यापैकी जवळपास ७० लोकांनी दीड वर्षानंतरही घराचा ताबा घेतलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसलाही प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही.